वेदसभेचे प्रमुख उपक्रम
१) ध्वनिमुद्रण प्रकल्प-
वेद हजारो वर्षे मौखिक परंपरेने चालत आले आहेत. प्रत्येक वेदाची पठणपरंपरा भिन्न आहे. एखाद्या वेदाची पठणपरंपरा नष्ट झाली की तिचे पुनरुज्जीवन करता येत नाही. काळाच्या ओघात अनेक वेदशाखा नष्ट झाल्या.वेदाध्ययन करणा-यांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी झाली. त्यामुळे या वेदाध्ययनाच्या परंपरेचे रक्षण करण्यासाठी सभेने वेदांच्या ध्वनिमुद्रणाचा प्रकल्प हाती घेतला. सभेचे तत्कालीन अध्यक्ष कै. जयंतराव टिळक यांच्या पुढाकाराने आणि संस्कृत भाषेचे व्यसंगी विद्वान डॉ. श्री.शं. बहुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रकल्प संपन्न झाला. डेन्मार्क शासनाकडून सभेला सात वेदशाखांचे ध्वनिमुद्रण प्राप्त झाले. सभेने ऋवेद, सामवेद (कोथुम शाखा) यांचे ध्वनिमुद्रण पूर्ण केले असून सामवेदाच्या राणायनीय शाखेच्या काही भागाचे ध्वनिमुद्रण पूर्ण केले असून उर्वरित भागाचे ध्वनिमुद्रण लवकरच पूर्ण करण्याचा संकल्प आहे. या ध्वनिमुद्रण प्रकल्पांतर्गत सभेने सामान्यांना वेदवाङ्मयाचा परिचय करून देण्याच्या उद्देशाने “वेदपरिचय’,” सार्थ रुद्राध्याय’, ईशावास्योपनिषदृ विकृतिपाठ’ (विकृतिपाठ विवरणासह) या ध्वनिमुद्रिका तयार केल्या.
२) ग्रंथालय-
सभेमध्ये एक समृद्ध ग्रंथालय असून त्यात सुमारे ६००० संस्कृत भाषेतील ग्रंथ आहेत. तसे सुमारे ३५०० हस्तलिखित ग्रंथांचा संग्रह आहे.
३) प्रकाशने-
सभेने वेद व शास्त्र यांचा परिचय करुन देणारे ग्रंथ प्रकाशित केले आहेत.” वेदशास्त्रदीपिका’, ” ” प्राचीन भारतीय विद्येचे यथार्थदर्शन ‘, प्राचीन भारतीय विद्येचे पुनर्दर्शन ‘ या तीन ग्रंथांमध्ये दिग्गज विद्वानांच्या अभ्यासपूर्ण लेखांचा अंतर्माव आहे.तर ” ऋग्वेदीय नित्यविधि ‘ आणि” हिरण्यकेशीय नित्यविधि ‘ हे दोन ग्रंथ स्मार्त प्रवेश परीक्षेच्या अभ्यासक्रमासाठी तयार केले आहेत.” तैत्तिरीय ब्राह्मण ‘ ( मूलमात्र ) याग्रंथात प्रथमच तैत्तिरीय ब्राह्मणातील मंत्र व अनुवाक यांची सूची समाविष्ट केली आहे.
४) यज्ञीय पात्र संग्रहालय-
जनसामान्यांना यज्ञसंस्थेचा परिचय करून देण्याच्या उद्देशाने यज्ञीय पात्रांचे संग्रहालय निर्माण केले आहे. सदर प्रदर्शनीत सुमारे ७० पात्रे असून हे प्रदर्शन बाहेरगावी लोकांच्या मागणीनुसार भरविले जाते.
५) अध्यापन वर्ग
वेद, सोळा संस्कार,संस्कृत भाषेतील विविध ग्रंथ, स्तोत्रवाङ्मय यांचा परिचय करून देण्याच्या उद्देशाने अनेक वर्ग ऑनलाईन आणि ऑफलाईन माध्यमातून आयोजित करण्यात आले. या वर्गांना लोकांचा उत्तम प्रतिसाद मिळाल