परीक्षांची ठळक वैशिष्ट्ये
सरकार दरबारी समकक्षता प्राप्त असलेल्या तीन संपूर्ण परीक्षा वगळून इतर सर्व परीक्षा म्हणजेच सर्व वेदांच्या अभिज्ञ व कोविद परीक्षांच्या सर्व भागश: परीक्षा, सर्व वेदांच्या याज्ञिकीच्या अभिज्ञ व कोविदच्या सर्व भागश: परीक्षा, वेदांगाच्या अभिज्ञ व कोविदच्या सर्व भागश: परीक्षा, सर्व वेदांच्या समग्र संहिता परीक्षा, प्रवेश परीक्षा व वक्तृत्व परीक्षा वेदशास्त्रोत्तेजक सभेच्या व टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने २०१८ या वर्षापासून घेतल्या जातात. या विद्यार्थ्यांना सभा व टि.म.वि. यांच्या नावाने एकत्रित प्रमाणपत्र देण्यात येते.
– चार वेद आणि सर्व शास्त्रे यांच्या परीक्षा होतात.
– प्रत्येक वेदाचा अभ्यासक्रम त्या त्या वेदाच्या पठण परंपरेनुसार तयार केला आहे.
– वेदान्तशास्त्रात अनेक भेद असल्यामुळे प्रत्येकाची स्वतंत्र परीक्षा आहे. उदा. अद्वैत वेदान्त, विशिष्टाद्वैत वेदान्त इ. मिळून वेदान्त दर्शनाच्या चार परीक्षा आहेत.
– सभेच्या स्थापनेच्या वेळी पुराण प्रवचन करणारे अनेक पुराणिक होते. त्यामुळे पुराण विषयाची परीक्षा घेतली गेली.
– वेदाप्रमाणेच वेदांगग्रंथांचे सुद्धा मौखिक परंपरेत पठण केले जाते. त्यामुळे वेदांगांच्या परीक्षा घेतल्या जातात.
– श्रौत कर्मकांड व स्मार्त कर्मकांड यांच्याही परीक्षा घेतल्या जातात.
– धर्मशास्त्राचीही परीक्षा सभेकडून घेतली जाते.
– संकीर्ण परीक्षेत अनेक शास्त्रग्रंथांचे संकलन केले असून चूडामणि परीक्षेत एखादे शास्त्र निवडून ही परीक्षा देता येते.
– कोणत्याही शास्त्राची परीक्षा देण्यापूर्वी संस्कृत प्रवेश परीक्षेत उत्तीर्ण होणे अपरिहार्य आहे.
– याज्ञिकी म्हणजे कर्मकांडाची कोविद परीक्षा देणार्या विद्यार्थ्यालाही संस्कृत प्रवेश परीक्षेत उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.
– सभेच्या परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना या प्रमाणपत्राच्या आधारे भारतातील विद्यापीठात संस्कृत बी.ए. एम्. ए. व पी.एच्.डी. या परीक्षांसाठी प्रवेश मिळाला आहे.
– या सर्व परीक्षा सुरू करण्याचा प्रमुख हेतू होता तो म्हणजे वैदिक व शास्त्री विद्वानांना समाजमान्यता मिळवून देणे.