
परिसंवाद अंत्यसंस्कार व श्राद्धविधी
वेद सभेच्या वतीने दि. २८ व २९ सप्टेंबर २०२४ रोजी अंत्यसंस्कार व श्राद्धविधी या विषयावर द्विदिवसीय परिसंवाद आयोजित केला होता. या परिसंवादात अंत्यसंस्काराचे आणि श्राद्धविधिचे महत्त्व त्यावेळी केले जाणारे विधी,श्राद्धाचे प्रकार इ. अनेक विषयांवर गरुड पुराण, श्राद्थमंजरी, ब्रह्मकर्म इ. ग्रंथाच्या आधारे विवेचन करण्यात आले. वेद सभेचे उपाध्यक्ष आणि श्री शृंगेरी शारदा पीठाचे महाराष्ट्र प्रांत प्रतिनिधी वे.मू. विवेकशास्त्री गोडबोले, सभेचे पदवीधर स्मार्तचूडामणि वे. मू. दत्तात्रय जोशी, प्रसिद्ध याज्ञिक वे.मू. मंदार खळदकर यांनी या विषयांवर अभ्यासपूर्ण विवेचन केले. तसेच श्रोत्यांनी विचारलेल्या प्रश्नांना समर्पक उत्तरे दिली. या परिसंवादाला श्रोत्यांनी उत्तम प्रतिसाद दिला.
सभेच्या कार्यवाह श्रद्धा परांजपे यांनी सदर परिसंवादाचे सूत्रसंचालन केले.







श्री शंकराचार्य विरचित स्तोत्र पठण स्पर्धा
वेद सभेच्या वतीने रविवार दि. २२ डिसेंबर २०२४ रोजी श्री शंकराचार्य विरचित स्तोत्र पठण स्पर्धा आयोजित केली होती. एकूण सात गटात ही स्पर्धा आयोजित केली होती. इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतचे एकूण २०० विद्यार्थी यात सहभागी झाले होते.
यासाठी १४ परीक्षकांनी परीक्षणाचे काम केले. या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ त्याच दिवशी संध्याकाळी सहा वाजता इतिहासाचे ज्येष्ठ अभ्यासक, उत्तम वक्ते,रमणबाग प्रशालेतील विद्यार्थीप्रिय शिक्षक श्री. मोहन शेटे यांच्या हस्ते पार पडला. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना व पालकांना स्मरणशक्ती, संस्काराचे महत्त्व रोचक पद्धतीने पटवून दिले. उपस्थित परीक्षकांचाही सत्कार त्यांच्या हस्ते करण्यात आला.






दि. १३ ऑक्टोबर २०२४ व्याख्यान विषय आपले वेद आपली संस्कृती. वक्त्या श्रीमती श्रद्धा परांजपे


दि.१६ व १७ नोव्हेंबर २०२४ या दोन दिवशी अनुक्रमे जाणिजे यज्ञकर्म आणि वेदवाङ्मयातील स्त्रीजीवन या विषयावर सभेच्या कार्यवाह श्रद्धा परांजपे यांची व्याख्याने झाली. दुस-या फोटोत डावीकडून सभेचे कार्याध्यक्ष श्री. भगवंत ठिपसे कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौदामिनी हॅंडलूम्सच्या संचालिका अनघा घैसास

