
शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष २०२४-२५ कार्यकारिणी

अध्यक्ष
डॉ. गीताली टिळक
कुलगुरू आणि विश्वस्त, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, पुणे संपादक, छावा (लहान मुलांचे मासिक), कार्यकारी संपादक, मराठा (शोधपत्रिका), विविध सामाजिक संस्था आणि शैक्षणिक कार्यांमध्ये सहभाग. वेदशास्त्रोत्तेजक सभेच्या अध्यकक्षा म्हणून कार्यरत.

वे. मू. विवेकशास्त्री लक्ष्मण गोडबोले
उपाध्यक्ष
कृष्ण यजुर्वेद तैत्तिरीय शाखा क्रमांत अध्ययन वडील आणि गुरुजी वे. मू. लक्ष्मण भट्ट गोडबोले यांच्या कडे पूर्ण केले. जटा आणि घन अध्ययन काशी येथे वेदाचार्य श्री. सोमनाथ भट्ट बापट यांच्याकडे. ज्योतिष शास्त्राचे अध्ययन वडिलांकडे. ज्योतिष विशारद, ज्योतिष शास्त्री. 2018 या वर्षी, नक्षत्र, संज्ञा आणि फल हा विषय घेऊन पी. एच्. डी. प्राप्त. भारतीय संस्कृती, सोळा संस्कार, यज्ञ, शांती, ज्योतिष, वेदांचे माहात्म्य सांगण्यासाठी सुमारे 15 देशात प्रात्यक्षिके आणि व्याख्याने. शास्त्रीय संगीताचा विशारद पर्यंत अभ्यास. सध्या सातारा येथे श्रीकृष्ण यजुर्वेद पाठशाळा येथे अध्यापन करीत आहे. गेली दोन वर्षे वेदशास्त्रोत्तेजक सभेचे उपाध्यक्ष म्हणून कार्यरत. श्रीश्रुंगेरी दक्षिणाम्नाय पीठाचे महाराष्ट्र प्रांताचे प्रतिनिधी.

डॉ. गणेश उमाकांत थिटे
उपाध्यक्ष
जगन्नाथ शंकरशेठ शिष्यवृत्तीचे मानकरी. तत्कालीन पुणे विद्यापीठाच्या संस्कृत आणि प्राकृत भाषा विभागाचे विभागाध्यक्ष म्हणून सेवा निवृत्त. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे संस्कृत आणि वेदांचे प्राध्यापक. अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिषदांमधून संशोधन निबंधांचे सादरीकरण. अनेक विद्यार्थ्यांना पी. एच्. डी. साठी मार्गदर्शन. निवृत्ती नंतर भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर, पुणे इथे संशोधक म्हणून कार्यरत. वेदशास्त्रोत्तेजक सभेचे उपाध्यक्ष आणि परीक्षा मंडळाचे अध्यक्ष म्हणून कार्यरत.

श्री. भगवंत श्रीराम ठिपसे
कार्याध्यक्ष
विज्ञान आणि कलाशाखेचे पदवीधर. हवामान खाते, पुणे येथे २५ वर्षे सेवा. स्वेच्छानिवृत्तीनंतर उद्यानविद्या या विषयावर गेली ३० वर्षे व्याख्याने. दि रोझ सोसायटी ऑफ पुणे, दि इंडियन रोझ फेडरेशन, महाराष्ट्र नर्सरी मेन असोसिएशनचे माजी अध्यक्ष. पुणे, पाचगणी, कल्याण, डोंबिवली व विविध ठिकाणी गुलाबपुष्प उद्याने विकसित केली. गेली १० वर्षे वेदशास्त्रोत्तेजक सभेचे कार्यकारिणी सदस्य आणि गेली ८ वर्षे वेदशास्त्रोत्तेजक सभेचे कार्याध्यक्ष म्हणून कार्यरत.

श्री. श्रीकांत लक्ष्मण फडके
कोषाध्यक्ष
शिक्षण – बी. एस्. सी., एम्. एम्. एस्.रिजर्व बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, कल्पना ग्लास फायबर प्रा. लि. इत्यादी संस्थांमध्ये कार्य. गेली १० वर्षे वेदशास्त्रोत्तेजक सभेचे कोषाध्यक्ष म्हणून कार्यरत.

श्री. चंद्रशेखर दत्ताराम बापट
कोषाध्यक्ष
बँक ऑफ महाराष्ट्र इथून सेवानिवृत्त. वेदशास्त्रोत्तेजक सभेचे कोषाध्यक्ष म्हणून कार्यरत.

श्रीमती श्रद्धा परशुराम परांजपे
कार्यवाह
एम्. ए. (संस्कृत), संस्कृत पारंगत, विद्यानिष्णात.
वैदिक संशोधन मंडळ पुणे येथे ३० वर्षे संशोधन सहाय्यक म्हणून कार्यरत. टिळक महाराष्ट्र विद्यापीठात सुमारे २० वर्षे संस्कृतच्या अभ्यागत प्राध्यापक. संपादन – गागाभट्टकृत समयनय, तेत्तिरीयब्राह्मणमूलमात्रम्. ध्वनिमुद्रिका – वेदपरिचय, वेददर्शन, सार्थ रुद्राध्याय. आकाशवाणी पुणे केंद्रासाठी “अथातो वेदजिज्ञासा” मालिकेचे लेखन व संपादन. वेदवार्ता व प्राजक्त या मासिकांमध्ये सोळा संस्कार व ऋषिदर्शन लेखमाला. विभिन्न चर्चासत्रात वेदविषयक शोधनिंबध सादर. अनेक संस्थांमध्ये वेदविषयक व्याख्याने. अनेक विद्यार्थ्यांना वेदविषयक, कर्मकाण्डविषयक ग्रंथ, महाकाव्य इत्यादींचे विनामूल्य अध्यापन.
पुरस्कार – १) पुणे की आशा पुरस्कार २) महाराष्ट्र ब्राह्मण सभा पुरस्कार ३) जागतिक महिला दिनानिमित्त पुरस्कार.
वेदशास्त्रोत्तेजक सभा पुणे या संस्थेत एप्रिल १९९८ पासून कार्यकारी मंडळ सदस्य एप्रिल २०२२ पासून या संस्थेच्या मानद कार्यवाह.

श्री. प्रशांत पुंड
कार्यवाह
- अजाईलसॉफ्ट’ या सॉफ्टवेअर क्षेत्रातील कंपनीचे संस्थापक.
- माजी उपाध्यक्ष, पुणे मॅनेजमेंट असोसिएशन.
- संस्कृत पारंगत-टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे.
- आजीव सदस्य, भांडारकर ओरिएंटल रिसर्च इन्स्टिट्यूट, पुणे